केन्द्रीय विद्यालय आयुध निर्माणी भुसावळ येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती तसेच़ राष्ट्रीय एकता दिवस साजरा..
भुसावळ-अखिलेशकुमार धिमान
दिनांक- ०१नोव्हेंबर २०२२
केन्द्रीय विद्यालय आयुध निर्माणी भुसावळ येथे दिनांक ३१ आँक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती तसेच़ राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आले.
सदर प्रसंगी सकाळी शालेयी प्रार्थना सभेनंतर ई.११ वी व ई.१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी रनिंग चे आयोजन केले त्यात “राष्ट्रीयएकता सर्वोपरी, एक भारत श्रेष्ठ भारत व सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे” अशी उद्घोषणा दिली .त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन चारित्र्य वर विद्यार्थ्यांनी इंग्रजी व हिंदी भाषेत व्याख्यान केले. तसेच़ प्राथमिक विद्यालय च्या ३ मुलांनी सरदार वल्लभभाई पटेल ची भुमिका मध्ये रोलमाॅडल स्वरुपात प्रदर्शन केले.
सदर प्रसंगी शाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांना “राष्ट्रीय एकता ” ची हिंदी भाषेत कु. संध्या परदेसी व इंग्रजी भाषेत संदेश निनावे यांचे द्वारे शपथविधी देण्यात आली. “राष्ट्रीय एकता म्हणजेच़ राष्ट्राचे सन्मान” हेच़ राष्ट्रीय एकता दिवस व सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रति सर्वाचे प्रथम उत्तरदायित्व आहे असे भाषण प्राचार्य नितीन उपाध्याय यांनी सादर केले .
त्यानंतर कु.संध्या परदेसी यांनी आयोजित केलेली प्रदर्शनी चे उद्घाटन प्राचार्य नितीन उपाध्यय व प्रधानाचार्य सुरेश नरहिरे यांचा हस्ते करण्यात आले. सदर कार्यकमास वरिष्ठ सचिवालय सहायिका सौ. उषा तिवारी, सौ. रंजना विगम, सौ. सीमा बाथम,अखिलेश पांडे, निलेश बेलोकर आदी उपस्थित होते.