दुकानूफोडी करुन चोरी करणारा मिथुन आखेर स्थानिक गुन्हेशाखेचा अटकेट.
जळगांव-विशेष प्रतिनिधि
दिनांक- १४ नोव्हेंम्बर २०२२
जळगांव जिल्हात घरफोडी,दुकानफोडी करुन चोरी करण्यास वाढ झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार व अप्पर पोलिस अधीक्षक चाळीसगांव रमेश चोपडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किसन नजनराव पाटील यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार
दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किसन नजनराव पाटील यांना गुप्तबातमीदार द्वारे माहिती मिळाली होती कि,पाळधी ता. धरणगांव येथील पत्राची दुकान फोडी करुन मोबाईल व इतर वस्तू मिथुनसिंग मायासिंग बावरी रा. कजगांव ता.भडगांव यानी केली असून त्यातील रियलमी कंपनीचा मोबाईल त्याचा कडे आहे व तो वापरतो आहे. बातमीमिळताच किसन नजनराव पाटील यांनी त्यांचा अधिनस्त असलेले पोलिस ठाणे अंमलदार पो.हे.कां लक्ष्मण अरुण पाटील पो.ना. रणजित अशोक पटील,पो.ना.किशोर मनराज राठौड,पो.ना.श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पो.काँ.विनोद सुभाष पाटील, चा.पो.काँ.मुरलीधर सखाराम बारी, यांचे पथक तयार करुन त्यांना कजगांव ता. भडगांव येथे रवाना केले असता आरोपी मिथुनसिंग मायासिंग बावरी उ.व.३२ हा कजगांव येथे मिळुन आला . त्याचा कडे धरणगांव पोलिस स्टेशन गु.र.न.२२६/२०२२भादंवि क- ४६१,३८० या गुन्हातील चोरी झालेला ५५००/- रु.किं चा रियलमी कंपनी चा मोबाईल आढळून आला पोलिसांनी खाकीदाखवल्यास त्यांनी पाळधी गावातील एक दुकानाचे कुलुप तोडून चोरीची घटना अंजाम दिल्याचे कबूल केले पुढील कारवाई साठी त्याला धरणगांव पोलिस स्टेशनचा ताब्यात देण्यात आले आहे.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.