पारोळा तालुक्यातील करमाड खुर्द येथील अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांपासून बेपत्ता.
पारोळा विशेष प्रतिनिधी
दिनांक:१३ नोव्हेंबर २०२२
पारोळा: पारोळा तालुक्यातील करमाळ खुर्द येथील १६ वर्षीय तरूणीचे सुमारे ८ महिने पासून अपहरण झाले असून याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
करमाड खुर्द येथील तरूण प्रमोद उर्फ पप्पू साहेबराव पाटील याने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजता अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून मुलीचे आई वडील यांनी पारोळा पोलीसांना “मुलीचा तपास लागला का”? याची विचारणा केली असता तपास सुरू असल्याचे पोलीस सातत्याने सांगत आहे. अल्पवयीन मुलीचा शोध त्वरीत करून पालकांच्या स्वाधीन करावे अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg