केंद्रीय विद्यालय आयोग निर्माण आणि भुसावळ येथे सतर्कता जागरूकता सप्ताहाचे आयोजन पूर्ण.
भुसावळ-अखिलेशकुमार धिमान
दिनांक-१३ नोव्हेंबर २०२२
भुसावळ-केंद्रीय विद्यालय आयोग निर्माण आणि भुसावळ येथे सतर्कता जागरूकता सप्ताहाचे आयोजन दिनांक ३१ ऑक्टोंबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले होते. या निमित्ताने विविध कार्यक्रमांमध्ये शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी आपला सहभाग नोंदविला. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड दीपनगर येथील केशराज मीना अभियंता व निमजे ,अभियंता यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी तसेच पदाधिकाऱ्यांना सत्यनिष्ठतेची प्रतिज्ञा ग्रहण करविली.
केंद्रीय सतर्कता आयोगाच्या संकेतस्थळावर देखील सर्वांनी इ-प्रतिज्ञा घेतली. सर्व विद्यार्थ्यांमध्ये सतर्कता, प्रामाणिकपणा व सचोटी या मूल्यांची वाढ व्हावी म्हणून वकृत्व स्पर्धा, प्रबोधनावर भाषण, चित्रकला स्पर्धा, स्लोगन लेखन स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले. प्राचार्य नितीन कुमार उपाध्याय यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संदेश निनावे, स्नातकोत्तर शिक्षक, इंग्रजी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपणे समन्वयन केले. कार्यक्रमाच्या यशस्वतीसाठी सीमा बाथम, प्र.स्ना.शि. इंग्रजी, कुमारी संध्या परदेशी,काजल महाजन, भूषण शिंपी यानी सहकार्य केले.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील लिंक 👇वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg