पत्रकार व प्रवासियांचा सतर्कता मुळे टळला सचखंड एक्सप्रेस चा अनर्थ.
प्रतिनिधि-अखिलेशकुमार धिमान
दिनांक: १८ नोव्हेंबर २०२२
भुसावळ:अमृतसर-हूजूरसाहेब नांदेड दरम्यान धावणारी गाडी क्रमांक १२७१६ अप सचखंड एक्सप्रेस चा प्रवासी व रेल कर्मचारींची तत्परता मुळे मोठा अनर्थ काल दिनांक १७ नोव्हेंबर रोजी टळला.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, काल दिनांक १७ नोव्हेंबर रोजी अमृतसर ते हूजूरसाहेब नांदेड या दरम्यान धावणारी १२७१६ अप सचखंड एक्सप्रेस सुमारे पांच तास उशीराने धावत असुन सकाळी ९:०५ मि. ने भुसावळ येथील स्थानकवर पोहोचली व भुसावळ येथे सुमारे २५ मिनटांनी ९:३० वा. सुटली सकाळी १०:३५ मिनटांनी ही गाडी पाचोरा स्थानकावर पोहोचण्याआदी सदर गाडीतून डिब्बा क्रमांक एस -४ मध्ये वृत्त संकलनासाठी भुुुसावळ ते पाचोरा प्रवास करत असलेले स्पीड न्यूज महाराष्ट्राची टीम व प्रवासियांना काही तरी जळत असल्यांचा वास येत असल्याने पाचोरा स्थानकावर पोहोचून स्थानकावर उपस्थित स्टेशन मास्टर एस. टी. जाधव तसेच सीटीआई एन.डी.धिवरे यांना कळविले.
सीटीआई धिवरे यांनी तत्काळ पांईन्टसमैन सुनिल अहिरे व लहू राठौड यांना लागलीच बोलावून चेक करायला सांगितले तसेच आरपीफ बी.बी. सुरवाडे यांना माहिती दिली आरपीएफ सुरवाडे यांनी तत्काळ गाडीचे गार्ड ए.के. अहिरे(भुसावळ) यांना सूचित केले अवघ्या तीन ते चार मिनटातच रेलकार्मचारींने गाडी चेक केली एस-४ या डिब्बेचे ब्रेक गरम होऊन चिटकले असल्याचे त्यंचा निर्दर्शनात आले व सर्वांनी ते तत्काळ दुरूस्त करुन सचखंड एक्सप्रेस ला पुढील प्रवासासाठी रवाना केले.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg