ग्रामपंचायतिच्या कारभारामुळे नावरे गावातील नागरिक त्रस्त.
मुबई : विशेष प्रतिनिधी
दिनांक : १९ नोव्हेंबर २०२२
भाग : एक
जळगांव: जळगाव जिल्हात असलेल्या भडगाव तालुक्यातील नावरे येथील नागरिक ग्रामपंचायत च्या कारभारामुळे चांगलेच त्रस्त असल्याचे नागरिकांनी स्पीड न्यूज महाराष्ट्राशी बोलताना सांगितले. सविस्तर वृत्त असे की स्पीड न्यूज महाराष्ट्र च्या माध्यमातून राज्यभर “आपले गांव आपली समस्या” हा कार्यक्रम सुरु असून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक आपली समस्या स्पीड न्यूज महाराष्ट्र च्या “आपले गांव आपली समस्या” ह्या कार्यक्रमात मांडत असतात. आज रोजी “आपले गाव आपली समस्या” हा कार्यक्रम भडगाव तालुक्यातील बामरूड प्र.ब. व नावरे ह्या ठिकाणी घेण्यात आला ह्या ठिकाणी नागरिकांनी गावातील घरकुल,सार्वजनिक शौचालय,गावठाण जमीन,सार्वजनिक मुतारी अशा अनेक समस्या असल्याचे आमच्या विशेष प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. आपल्या समस्यां बद्दल ग्रामसेवक शाम पाटील ह्याच्याशी नागरिक बोलतात तर ते नागरिकांचे म्हणणे एकूण घेत नसल्याच्या संतप्त भावना ही नागरिकांनी ह्या वेळी व्यक्त केल्यात. शासन मोठ्या प्रमाणावर गावातील विकास कामावर निधी खर्च करत असतो. पण त्या खर्चाचे उपोयोजित कामावर खर्च होत नसल्याचे ही ह्या ठिकाणी नागरिकांनी सांगितले. गावातील गावठाणात प्रस्तापितानी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून. ह्या मुळे बेघर उपेक्षित समाजावर अन्याय होत असल्याचे समजते.
भाग : एक, पुढे क्रमश:
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg