महाराष्ट्र

श्री शिव पांझरेश्वर भगवान भोलेनाथ यांची महाआरती संपन्न

धुळे (प्रतिनिधी) आकर्षक विद्युत रोषणाई व विविधरंगी फटाक्यांची आतिषबाजी करीत महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम गोटे व तेजस अप्पा गोटे कार्याध्यक्ष धुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, आयोजक दीपक जाधव, सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या व उपस्थित जनसमुदायातील जोडप्यांच्या हस्ते संपन्न झाला.

दिनांक १२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषिमंत्री लोकनेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त अनिल अण्णा गोटे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली व तेजस अप्पा गोटे कार्याध्यक्ष धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या आध्यक्षतेखाली व दीपक जाधव यांच्यावतीने उपस्थित जोडप्यांच्या हस्ते झुलता पूल येथील शिव पांझरेश्वर भगवान भोलेनाथ यांची महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व सायं ७ वाजता संपन्न झाला आहे.

यावेळी डॉ अनिल पाटील, मनोज वाल्हे, प्रशांत भदाने, अविनाश लोकरे, नंदकुमार येलमामे, यशवंत पाटील, रंजीत बछाव, बाळू शेंडगे, वाल्मीक साळुंखे, सचिन पोतेकर, महिला संध्याताई गोटे, छाया सोमवंशी, ज्योतीताई चौधरी, प्रविना भावे, सुरेखा नांद्रे, गायत्रि पाटील, सुषमा महाले आदी व भैय्या बछाव, प्रकाश महानोर, भैया बहाळकर, नटराज चौधरी, प्रवीण राणा, नंदू भामरे, शरद बोरसे, नाना पाठक, अजय निकम, शिवाजीराव पाटील, विशाल चित्ते, कन्हय्या परदेशी, नाना पाटील, प्रितेष अग्रवाल, कार्तिक पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भक्तगण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती दीपक जाधव सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे यांनी दिली व अविनाश लोकरे सोशल मीडिया व प्रसिध्दी प्रमुख यांनी प्रसिद्ध केली.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे