मातृशक्तीने स्वतःला अपडेट करतांना संस्कार संस्कृती जोपासावेत ; महिला दिनानिमित्त अक्षय कलाल यांचे प्रतिपादन
बोरद (प्रतिनिधी) शहरातील निर्मला फाउंडेशन संचलित प्रज्ञा क्लासेसचे संचालक मेघश्याम धनगर सरांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच औचित्य साधून महिलांचा सन्मानार्थ कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात चिमुकल्यांनी थोर महिला व्यक्तीमत्वांची वेशभूषा साकारून आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान सरस्वती पूजना नंतर प्रमुख वक्त्यास हिंदु धर्मातील पवित्र व जीवनातील आदर्श मार्ग दाखविणारा ग्रंथ श्रीमदभगवत गीता भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले अक्षय सीमाताई भगवान कलाल म्हणाले की, आजच्या काळात अगदी वेगाने बदल घडत असतांना, मातृशक्तीने स्वतःला अपडेट करतांना आपले प्राचीन संस्कार, संस्कृती विसरू नये. घरातील आई म्हणजे संस्काररूपी विद्यापीठ आहे. आपल्या अनुकरना नुसार पुढील पिढी घडणार असल्याने आपलं प्रत्येक पाऊल सांभाळून असायला हवं, अस मत कलाल यांनी व्यक्त केल.
सदर कार्यक्रमात नगरसेविका प्रतीक्षा दुबे, नगरसेविका सूनयना उदासी, माजी नगरसेविका कोमल सोनार, तथा अनेक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच सुंदर सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी नेहा चव्हाण यांनी केलं. आभार प्रदर्शन करतांना प्रज्ञा क्लासेसच्या संचालिका मोहिनी धनगर यांनी स्वानुभवातून काही महत्वपूर्ण संदेश महिलांना दिले.