शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस युवराज माळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला !
गॅस सिलिंडर स्फोटातुन वाचवले वृद्ध दाम्पत्यास
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी दि. 16 मार्च रोजी सकाळी आपल्या घरासमोरील घरात देविदास नागो पाटील, व लिलाबाई देवीदास पाटील हे पती-पत्नी वृद्ध दांपत्य 80 वर्षीय राहत होते सकाळी साडेसहा वाजताची वेळ दोघं पती-पत्नी वृद्ध असल्याने त्यांना सकाळी उठून चहा करण्यासाठी उठले असता भारत एजन्सीचे गॅस कनेक्शन होते. गॅस सुरू करताच गॅसने पेट घेतला. त्यांच्या घरासमोर अवघ्या शंभर मीटर अंतरावर असणारे भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांची अचानक घरात काहीतरी आग लागल्याची दिसताच क्षणाचाही विलंब न करता घराकडे धाव घेतली. घरात घुसून पाहिले असता गॅसने पेट घेतलेला होता. क्षणाचा विलंब न करता युवराज माळी यांनी घरातील वृद्ध दाम्पत्यास घराबाहेर काढून गॅस सिलेंडरवर ओल्या गोधड्या टाकल्याने गॅस बंद, झाल्याने सिलेंडर भरचौकात आणला व.सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्या प्रसंग अवधाने कुठलाही अनर्थ घडला नाही.
यावेळी माजी सरपंच संजय देसले, अधिकार देसले, किरण पाटील यांनी घराकडे धाव घेऊन, संपूर्ण गावकरी जमा झाले होते. सुटकेचा निश्वास सोडला तसेच वृद्ध दाम्पत्यास होणारी घटनेपासून वाचविण्याबद्दल भडणे पोलिस पाटील युवराज माळी यांचे या धाडसाबद्दल “माणूस जन्माला येतो आणि जातो, पण माणुसकी धर्म पाडणारे लाखातुन एक असतात त्यालाच आपुलकी व माणुसपण म्हणतात” या शब्दात भडणे येथील ग्रामस्थांनी कौतुक केले.