होली के रंग आदिवासीयो के संग ; राणा दाम्पत्य मेळघाटात साजरी करणार होळी
अमरावती (महेंद्रसिंग पवार) होली के रंग आदिवासीयो के संग, दरवर्षीप्रमाणे यंदाही खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा हे आपली होळी मेळघाटात साजरी करणार आहेत.
दिनांक 17 ते 19 मार्च असे सलग 4 दिवस राणा दांपत्य, युवा स्वाभिमानी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मेळघाटातील अतिदुर्गम भागात जाऊन आदिवासींच्या प्रथा परंपरा जोपासून आपली होळी साजरी करणार आहेत. मेळघाटात सलग 12 व्या वर्षी होळी साजरी करून खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा हे आदिवासीसोबत असणारी आपली बांधीलकी जोपासणार आहे. तसेच खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्या स्वागतासाठी धारणी, चिखलदरा तालुक्यातील आदिवासी बंधू भगिनी व युवा स्वाभिमान कार्यकर्ते तयारीला लागले आहे.
होळी हा आदिवासींचा अत्यन्त महत्वाचा सण आहे. स्वतःला मेळघाटची कन्या समजणाऱ्या व आदिवासींसोबत आपले घट्ट नाते जोपासणाऱ्या खासदार नवनीत रवी राणा व निसर्गप्रेमी आमदार रवी राणा हे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली होळी आदिवासी बंधू भगिनींसोबत मोठ्या उत्साहात साजरी करणार आहे. सलग 12 व्या वर्षी आपली परंपरा जोपासत आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा हे धारणी, चिखलदरा, चुरणी आदी भागातील अतिदुर्गम गावांमध्ये जाऊन होळीपूजन करतील आणि आदिवासीसोबत रंगाची उधळण करीत पारंपरिक आदिवासी नृत्य व संगीताच्या तालावर ठेका धरीत आदिवासींच्या आनंदात सहभागी होतील. आदिवासी भगिनींना साडी वाटप, क्रीडाप्रेमी तरुणांना बॅट, बॉल, हॉलीबॉल किट वाटप आदी करून त्यांच्याशी असणारे आपले नाते जोपासतील, सोबतच आदिवासी गावातच मुक्काम करून त्यांच्या व्यथा वेदना जाणून घेऊन मेळघाटातील समस्या निराकरणासाठी करावयाच्या उपाययोजना यावर विचारमंथन सुद्धा करतील आणि आदिवासींना फगव्याचे वाटप करतील.
गुरुवार दिनांक 17 मार्च ला सकाळी ठीक 10.30वाजता आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा हे आपल्या कार्यकर्त्यांसह परतवाडा -धारणी साठी प्रयाण करतील. सकाळी 11.30 ला परतवाडा सर्किट हाऊस वर कार्यकर्ता बैठक घेतील. नंतर दुपारी 2 वाजता विश्रामगृह धारणी येथे पोहोचतील. तिथून व्हाया टेम्भरु, सोनाबर्डी, रत्नापुर, मोखा, चिंचघाट, गोंडवाडी, या ठिकाणी होळीपूजन व परिसरातील युवा स्वाभिमान शाखा फलक अनावरण करतील. यानंतर कुसुमकोट, मांडवा, जुटपाणी, बारू, बीजुधावडी, गडगामालू, मांडूप या गावांना भेटी देऊन ढाकना येथील विश्रामगृहावर मुक्काम करतील.
18 तारखेला हरीसाल कडे प्रयाण करून अडाव, तारुबंधा, पाठकौर, केली, चिखली, केसरपूर, विरोजा, हरीसाल मार्गे चुर्णी जातील व यानंतर चौराकुंड, फॉरेस्ट मालोद, चौपन, भूतरुम, रुईपठर, चिलाठी, हतरु, सरवारखेड येथुन राहू या गावी मुक्काम करतील. दिनांक 19 रोजी सीमोरी, खुंटीदा, सुमीता, सालीता, इकराई, बोरघा, हिला, बिबा, जरीदा, चुर्णी, कोटमी, तोरणावाडी, बगदरी व डोमा या गावांना भेटी देतील.
खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्या या मेळघाट होळी दौरा अधिक माहिती व नियोजनासाठी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, उपेन बछले संपर्क प्रमुख, दुर्योधन जावरकर धारणी ता. अध्यक्ष, राजेश वर्मा चिखलदरा ता.अध्यक्ष, राम हेकडे चिखलदरा अध्यक्ष, अविनाश काळे,उमेश ढोणे, दीपक जलतारे, मंगेश कोकाटे, सचिन सोनोने, पवन हिंगणे,शुभम उंबरकर आदींसोबत संपर्क साधण्याचे आवाहन युवा स्वाभिमान पक्षातर्फे करण्यात आले आहे.