जळगाव जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्रविशेष
Trending
जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक पदी एम.राजकुमार – डाॅ.प्रवीण मुंढे यांची बदली.
जळगांव- विशेष प्रतिनिधि

दिनांक : २१ आक्टोबर २०२२
जळगाव :पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे.
गुरुवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत. जळगांव येथील पोलीस अधीक्षक पदी एम.राजकुमार यांची नियुक्ति झाली आहे.
एम. राजकुमार सध्या नागपूर लोहमार्ग येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ येथे चार वर्ष एस.पी.म्हणून काम सांभाळले. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच जळगावच्या पोलीस अधीक्षक पदासाठी एम.राजकुमार यांची नियुक्ती होणार असल्याची माहीती समोर आलीं होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. मुंढे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.