नवापूर येथे भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात
नंदुरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील नवापूर येथे भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार राष्ट्रीय मतदार दिवस मोठया उत्साहात पार पडला. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील स्व प्रताप पाटील चर्चासत्र भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा तहसिलदार मंदार कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, नायब तहसिलदार अरविंद गावीत, प्रा.छाया गावीत आदी उपस्थित होते.
यावेळी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमात व मतदार यादी शुध्दीकरण कामात उत्कृष्ट कार्य करणा-या २० बिएल ओ यांना प्रशस्तीपात्र देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच मतदार दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धत प्रथम, दितीय व तुतीय क्रमांक पटकाविणारी-या व सहभाग घेणारी-या विद्यार्थीना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवारांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच सर्व उपस्थीतांना मतदार दिनाची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमात मतदार दिनबाबत व निवडणुक कामाविषयी बिएल ओ यांनी आपले अनुभव कथन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व व लोकशाही बाबत महत्वाचे मार्गदर्शन केले. त्यांनी लोकशाही बलकटी करीता निवडणुकीत निपक्षपाती मतदान करण्याचे आहवान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.ई एस गेडाम यांनी केल तर आभार बीएल ओ विशाल पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.छाया गावीत, महसुल सहायक राजकुमार सुरवाडे, तंत्र सहायक विलास गावीत, लक्षमन गावीत यांनी केले होते. हा कार्यक्रम कोविड-१९ च्या नियमाचे पालन करुन यशस्वी रित्या पार पडला.