बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्यांनी महिलांचा आदर करणे आम्हाला शिकवू नये ; शिवसेनेचे प्रत्युत्तर
मुक्ताईनगर (सचिन झनके) ”ज्या मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेचे शोषण केल्याचा गंभीर आरोप ३७६ गुन्हा औरंगाबादला दाखल आहे. त्यांनी आम्हाला स्त्रियांचा सन्मान बाबत शिकवू नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्णयाचे पूर्णपणे पालन केले पाहिजे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यकर्त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येत नाही. सार्वजनिक दुःखवटा भारतामध्ये घोषित करण्यात आले तरी राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष यांची सावदा येथे जाहीर सभा घेण्यात आल्या आहे.
देशाची गाण कोकिळा म्हणून ओळखली जाणारी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी दुखवटा जाहीर करण्यात आलेला होता. प्रदेशाध्यक्षांनी केलेला पहिला आरोप त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेखनीय शब्दात आरोप केला आहे. तोंडाला कपडा बांधून एखाद्या महिलेच्या गाडीवरती हल्ला करणारे हे लोक आहे. तर उत्तर जळगाव जिल्ह्याचे अल्पसंख्यांक संघटक अफसर खान यांनी यावरती घणाघाती उत्तर दिलेले आहे.