गोविंद नगर(ठेलारी वस्ती) मालपूर येथे नवीन शाळा सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू
- मालपूर : मालपूर गावापासून 3 कि.मी.अंतरावर रामी रोडवर ठेलारी समाजातील 10 ते 15 कुटूंब दूरवर पसरलेल्या शेतात राहत आहेत. त्या वस्तीस “गोविंद नगर ” असे नाव देण्यात आले आहे.
6 ते 14 वयोगटातील 20 ते 25 विद्यार्थी असून काही विद्यार्थ्यांची नावे शाळेत दाखल असूनही शाळेत उपस्थित राहत नाहीत. मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी तसेच शिक्षक संजय बैसाणे यांनी भेट देऊन तेथील पालकांशी संपर्क साधला.
त्यानंतर गावातील सन्माननीय जि. प.सदस्य दादासाहेब महाविरसिंह रावल, सरपंच मच्छिंद्रभाऊ शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच बापूसाहेब डी.एस.सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी बीट दोंडाईचा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर डी.एस.सोनवणे यांनी दि.30 मार्च 2022 रोजी सकाळी 9.00 वा.गोविंद नगर येथे भेट दिली.
लखन ठेलारी तसेच पालक, विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मुलांना शाळेच्या प्रवाहात टिकवून ठेवणे व शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून तसेच गावातील पदाधिकारी
जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकूळ बच्छाव यांच्या सहकार्यातून नवीन शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
लवकरच नवीन शाळा सुरू करावी त्यासाठी माझे स्वतःचे घर शाळेसाठी देण्यासाठी लखन ठेलारी यांनी साहेबांना विनंती केली.
तसेच विशेष आभार मानले. यावेळेस मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, शिक्षक संजय बैसाणे, चंचल नागरे , लखन ठेलारी, पालक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.