बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले तहसीलदाराना निवेदन,शासन मात्र बघ्याच्याच भूमिकेत
बोदवड तालुक्यात गेल्या सप्टेंबर ते ऑक्टोबर महिण्यातील गुलाबी चक्री वादळ व अतिवृष्टी झालेले नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन
बोदवड तालुका प्रतिनिधी
बोदवड : खरिपाच्या पेरणी पासून तालुक्यात पावसाचा लहरी पणा सुरू आहे कधी २१ दिवस खंड पडला तर कधी गुलाबी चक्री वादळ सह अतिवृष्टी झाली. या मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यामुळे सर्व शेतकऱ्याच्या मागणी नुसार , अतिवृष्टी,दुष्काळ या काळात झालेल्या नुकसानी मुळे बागायत, जिरायत, फळबाग नुकसान भरपाई साठी,
आताची प्रचलित हेक्टरी नुकसान भरपाई रक्कम जिरायत ६ हजार ५०० रुपये दराने मिळत आहे, ती फार कमी आहे त्यात आपला पीक नुकसानी चा भरपाई निकषात (३३% च्यावर) पंचनामा किती टक्के आहे, त्यानुसार खात्यावर भरपाई रक्कम मिळते..मात्र या दरात सुधारणा होऊन आताच अधिक वाढीव दराने भरपाई मिळावी त्याच प्रमाणे अंतिम आणेवारी (पैसेवारी) कमी व्हावी जेणेकरून पीक विमा भरपाई मिळण्याच्या साठी मदत होईल,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली..
या वेळी आबा पाटील, मानमोडीकर,बापूसाहेब देशमुख, गोळेगाव,भास्कर पारधी, पळसखेडान्यानोबा पाटील, सुरवाडे सोपान सावरे बोदवड,विनोद कोळी बोदवड तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , विशाल पाटील वरखेड,समाधान पा.विचवा.कालेखा वंजारी, वराड ,संदीप घडेकर वाकी,विजू चव्हाण, देविदास पाटील.जलचक्र जगदीश कोळी आदी तालुक्यातील शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.