चोपडा
चोपडयात भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंत्री नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन
चोपडा (जि.जळगांव) विश्वास वाडे, तालुका विशेष प्रतिनिधी
चोपडा : महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नवाब मलिक यांच्या पुतळा दहन करून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली व पुतळ्याला जोडा मारण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल भारतीय युवा मोर्चा चे तुषार पाठक प्रकाश पाटील, हिंमत पाटील, संजय श्रावगी, सुनील सोनगिरे, रवी मराठे, हेमंत जोहरी, भूषण महाजन, मनोहर बडगुजर, यांच्यासह भारतीय जनता पक्ष व भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.