लज्योश्री शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या बसेरा प्रोजेक्टच्या बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी मिलिंद बोदडे यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील झोपडपट्टीतील मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या लज्योश्री शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या बसेरा प्रोजेक्टच्या बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी मिलिंद बोदडे यांची निवड संस्थेचे अध्यक्ष अशोराज तायडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आले.
ह्या प्रोजेक्ट च्या माध्यमातून राज्यातील झोपडपट्टीतील मुलांसाठी प्री स्कुल शिक्षण तसेच डे केअर ची जबाबदारी मोफत घेतली जाते. आणि हे काम खूप मोठे असल्याचे आणि समाजाचे आपले काही देणे लागत असल्याने हे काम करण्यास मनापासून आनंद होत असल्याचे मिलिंद बोदडे यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्यात. लवकरच हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात सुरू करू असेही ते यावेळी बोलले. अशोराज तायडे यांनी त्यांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्यात. यावेळी प्रा.पंकज सपकाळे, स्पीड न्यूज महाराष्ट्रचे भुसावळ प्रतिनिधी गजानन बोदडे, लज्योश्री फिल्म्सचे जनसंपर्क अधिकारी मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.