परसोडा येथे श्रीराम मंदिराचे कलशारोहण व लोकार्पण सोहळा भागवत कराड यांच्या उपस्थितीत संपन्न
वैजापूर (भिमसिग कहाटे) तालुक्यातील परसोडा येथे श्रीराम मंदिराच्या कलशारोहण व लोकार्पण सोहळ्यात निमित्ताने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत . कराड, भाजपा जि.अ. एकनाथ जाधव, जि.सरचिटणिस डॉ दिनेश परदेशी, ता.अध्यक्ष. कल्याण दांगोडे, कैलास पवार, सुरेश राऊत, मोहन आहेर, अनिल वाणी, ज्ञानेश्वर जगताप, कचरू डिके, राजेंद्र चव्हाण, कारभारी काळे, प्रताप महेर, नारायण कवडे, किशोर धाडबळे, भिमसिग राजपूत, रणजीत बैनाडे, राजाराम शिंदे, गणेश कहाटे व परसोडा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
त्यावेळेस प्रस्तावित करतांना तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी रेल्वे स्टेशनचे प्रलंबित असलेल्या काम मार्गी लावावे व प्रत्येक रेल्वेला थांबा द्यावा, रेल्वे स्टेशन नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली असता त्याप्रसंगी बोलताना डॉक्टर भागवत कराड रेल्वे स्टेशन चे प्रश्न वर रेल्वे थांबा या प्रश्नावर लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करून स्टेशन नूतनीकरणासाठी 3 कोटी 75 लाख मंजुरी मिळाली होती. ती लवकर देण्यात यावी व प्रत्येक गाडीला थांबा द्यावा यासाठी लवकरच बोलणे करीन तसेच तालुक्यातील प्रत्येक रस्ता नाबार्ड अंतर्गत गुळगुळीत करून देऊ व त्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल व रस्त्यांचे कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावून वैजापूर कन्नड सिल्लोड हे तिन्ही तालुख्ये मी दत्तक घेतले आहे असे जाहीर केले व जसे अयोध्येतील राम मंदिराला जितके महत्त्व आहे. तितकेच महत्त्व गावातील श्रीराम मंदिराचे प्रत्येकाने दर्शन घेऊन आपले प्रत्येक दिवसाची सुरुवात करावी असे त्यांनी बोलताना सांगितले. तसेच मी माझ्या तर्फे तालुक्यातील 41 गावातील दहा हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप केले आहे व प्रत्येक शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला मदत करण्यासाठी आम्ही व आमचे सरकार सदैव बांधील राहू आमचा प्रत्येक कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना मदत गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी सदैव पुढे राहील याची मी ग्वाही देतो. तसेच पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत खंडाळा परसोडा ते करंजगाव रस्ता मंजूर करून ताबडतोब निधी उपलब्ध करून देईल असे आश्वासन त्यांनी ह्या वेळेस बोलताना दिली असता पर्सोडा नगरीच्या जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आले व जय श्रीराम च्या गजराने कार्यक्रमाची सांगता झाली.