महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी वीरांगना झलकारीबाई कोळी संस्थेच्या वतीने कष्टकरी महीलांचा सन्मान
धुळे : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चंदन नगर देवपूर धुळे येथे वीरांगना झलकारीबाई कोळी स्री शक्ति सामाजिक संस्थेच्या वतीने धुणी भांडी करून रांत्रदिवस कष्ट करणा-या कष्टकरी महिला भगीनींचा संस्थेच्या प्रमुख गीतांजली कोळी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदना बडगुजर यांच्या हस्ते नवी साडी व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी वीरांगना झलकारी संस्थेच्या अध्यक्षा व दारूबंदी महीला/युवा मोर्चाच्या प्रमुख गीतांजली कोळी यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहसी कार्याच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी उपस्थित महिलांना सांगुन धुळे जिल्हात दारूबंदीच्या कार्यासाठी महिला भगीनींनी पुढे या असे आवाहन केले. यावेळी वंदना बडगुजर, सुषमा मोरे, सारीका मोरे यांच्यासह परीसरातील महीला भगिनी उपस्थित होत्या.