चोपडा
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध
चोपडा (विश्वास वाडे) महाविकास आघाडीतील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने पूर्वसूचना व समन्स न देता चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन गेले त्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल यांच्या उपस्थित तहसील कार्यालयावर निषेध करण्यात आले व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी चंद्रहासभाई गुजराथी, घनश्याम पाटील, गोरख तात्या पाटील, इंदिराताई पाटील, प्रा नीलम पाटील, कल्पना पाटील, शाम परदेशी, हितेंद्र देशमुख, जीवन चौधरी, अतुल ठाकरे, नोमान काझी, हुसेन पठाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.