अंबड येथील शेतकऱ्यांचे अंबड महावितरणासमोर धरणे आंदोलन
शहापुर (देविदास भोईर) हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने हस्तपोखरी येथील शेतकऱ्यांनी अंबड येथील उपविभागीय कार्यालयात ठिय्या करत आंदोलन केले. जोपर्यंत शेतीपापंचा वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत महावितरण कार्यालयासमोरून उठणार नाही असे शेतकऱ्यांनी हट्ट धारल्यानंतर संबधित कनिष्ठ अभियंता धारकोंडे यांनी आज संध्याकाळपासून वीज पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना वेळेत विजपुरवठा देण्यात येईल असे यावेळी त्यांनी ठोस आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित चेअरमन दिनेशराव वाघ, प.स.सदस्य कैलास वाघ, उपसरपंच सोनाजी गाढे,माजी सरपंच नारायणराव सावंत, आसाराम भाऊ दौड, प्रकाश वायभट, पांडुरंग शिंदे, ग्रा.प.सदस्य तुकाराम चेपटे, आ.नारायण कुचे यांचे स्वीय सहाय्यक योगेश घुगे, विष्णु वाघ, भास्कर वाघ, सुधाकर वाघ, मनोहर घुगे, गणपत घुगे, संदीप आव्हाड, संदीप वाघ, नितीन वाघ, विठ्ठल सोनवणे, यदुराव अनपत, मारोती सावत, गणपत घुगे, गणेश घुगे, महादेव घुगे, बाबासाहेब वाघ, कारभारी अप्पा बोगाने, पिंटू रसाळ, राहुल दौड, व उपस्थित सर्व हस्तपोखरी येथील शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.