विक्रांत निधीचे एसआयटी चौकशी करून किरीट सोमय्या विरुद्ध गुन्हा दाखल करा ; शिवसेनेची मागणी
भुसावळ (प्रमोद बावस्कर) 2013 मध्ये आय एन एस विक्रांत ही भारताची युद्धनौका वाचविण्यासाठी तिचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू करून प्रचंड निधी गोळा केला होता. त्यासाठी रेल्वे स्थानकावर विमानतळावर डबे घेऊन उभा राहिला. लोकांनी आय एन एस विक्रांत ही देशाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने लोकांनी सदर हाताने डब्यांमध्ये दान दिले. यात नेव्ही नगर मध्ये राहणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांनी पाच ते दहा हजार रुपये प्रमाणे प्रत्येकी मदत केली या रकमेचे किरीट सोमय्या यांनी काय केले ही रक्कम भंगारात जाऊ पाहणाऱ्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनवण्यासाठी राजभवनात जमा करणार होता मात्र किरीट सोमय्या यांनी जमा केलेली रक्कम राजभवनात दिलीच नसल्याचे माहिती अधिकारातून राज भवनातून मिळालेल्या पत्रात म्हणण्यात आले आहे.
यामुळे किरीट सोमय्या यांनी देशातील व राज्यातील जनतेच्या भावनांशी खेळून एक प्रकारे देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, याकरिता भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शहर प्रमुख निलेश महाजन बबलू बराटे, उप तालुकाप्रमुख पप्पू बोरसे, युवा सेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, तालुका अधिकारी हेमंत बराटे, कैलास लोखंडे, दीपक धांडे, वरणगाव शहर प्रमुख निलेश ठाकूर, संतोष माळी, निलेश ठाकूर, पवन ना ले, धनराज ठाकूर, कैलास जाधव, सुनील देव, गाठोडे, अतुल पाटील, विलास वंजारी, पवन मेरा, मोहसीन खान, शहरी व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते शिवसैनिक हजर होते.