शिंदखेडा शहरात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सदिच्छा भेट
नगरपंचायत महाविकास आघाडीला ताब्यात घेण्यासाठी कामाला लागा
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी निकटवर्तीय मिलिंद देसले, निलेश देसले यांच्या निवासस्थानी भेट घेतली सदिच्छा भेटी प्रसंगी महा विकास आघाडीचे विविध कार्यकर्ते व त्यांच्यावर प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते तसेच व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी शिंदखेडा शहरातील प्रतिष्ठित नागरिक व तरुण युवक उपस्थित होते.
एकनाथ खडसे यांनी महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत सामाजिक राजकीय व विविध विषयावर हितगूज केले. शिंदखेडा शहराच्या विकासाच्या संदर्भात आढावा घेतला असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना शिंदखेडा शहराच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात सखोल माहिती देण्यात आली तसेच शिंदखेडा नगरपंचायतीच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात विश्लेषण केले असता यांनी महा विकास आघाडी च्या कार्यकर्त्यांना आश्वासित केले की येणाऱ्या काळात शिंदखेडा नगरपंचायत व पंचायत समिती जिल्हा परिषद विविध निवडणुकीमध्ये जोरात कामाला लागून सत्ता स्थापन करण्याचे आश्वासित केले.*
त्याच प्रसंगी शिंदखेडा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांनी खडसे यांना 12 आमदारांचा प्रश्न उपस्थित केला असता त्यावर उत्तर देताना बारा सदस्यांमध्ये एकनाथराव खडसे यांचे नाव असल्यामुळे राज्यपाल कसे बरे सही करणार असे हास्य स्मित करून उत्तर दिले पुढे सांगताना म्हटले की भारतीय जनता पार्टी वर सध्या स्थितीत प्रचंड नाराजी असून लोकांच्या मनात खदखद आहे व ही खंत योग्य वेळी नक्कीच प्रकट होईल. एकनाथ खडसे यांची शिंदखेडा शहरातील व्यापारी असोसिएशन च्या विविध पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व शिंदखेडा शहराच्या व परिसराच्या औद्योगिक विकासाच्या संदर्भात विविध विषयांवर हितगूज केले.
शेवटी खडसे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढून सर्वांना जोरात कामाला लागण्याचे आदेश दिलेत. याप्रसंगी शिंदखेडा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक अहिरे, नगरसेवक उदय देसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील शहर उपाध्यक्ष मिलिंद देसले भारतीय जनता पार्टीचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, माजी प.स. सदस्य प्रकाश चौधरी, निशाने गावाचे सरपंच विनायक पाटील ,प्रा.सतीश पाटील , व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाळू बोरसे,मोहन परदेशी, राजेंद्र तुळशीराम पाटील,माजी नगरसेवक दिनेश माळी,शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष देसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गोलू बाबा देसले ,चेतन देसले,वैभव देसले ,उदय देसले, निखिल पाटील ,उमेश चौधरी, हर्षल देसले, उदय पाटील,मयुर पवार, अमोल देसले, अक्षय बैसाणे, मनोज पाटील,नाना मिस्तरी, गोलू पाटील,बंटी गोधवानी, सागर सोनार , अँड. निलेश देसले उपस्थित होते उपस्थित होते.