केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने हि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांचा प्रमुख उपस्थित तहसिलदार यांना शिरपूर भाजपाचे निवेदन
शिरपूर : विशेष तालुका प्रतिनिधी
शिरपूर : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल, डिझेल वरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून पेट्रोल डिझेलचे भाव कमी करुन जनतेला दिलासा दिला पाहिजे यासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांचा नेतृत्वाखाली तहसिलदार आबा महाजन यांना (दि.१२ नोव्हेंबर) रोजी शिरपूर भारतीय जनता पार्टीने मागणीचे निवेदन दिले आहे. तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, नगर सेवक देवेंद्र राजपुत, माजी नगर सेवक बापु थोरात, युवा मोर्चा विक्की चौधरी, राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, राधेश्याम चौधरी, विजय सुर्यवंशी, हेमंत बोरसे, राजेंद्र गुजर, गणेश माळी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांनी तहसिलदार यांचाशी याविषयी सविस्तर चर्चा केली.



