इच्छुकांच्या जागी बहुतांश महिला, सोयगाव नगरपंचायतीचे नव्याने आरक्षण सोडत.
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : गुडघ्याला बाशिंग बाधुन असलेले भावी उमेदवारांना आरक्षणाचा चकवा,मागिल एक वर्षापूर्वी बरखास्त झालेली नगरपंचायत निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सन २०२१ मध्ये हालचाल केली होती तसेच निवडणूक कार्यक्रम सुरू झाला होता त्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात आरक्षण ही सोडत केली होती मात्र ओ बी सी यांचे राजकीय आरक्षण रद्द झाले असल्याने तसेच राज्य शासनाने अध्यादेश काढून ओ बी सी समाजाचे आरक्षण ९०% शाबूत ठेवत आज दि १२(शुक्रवारी) नव्याने आरक्षण काढण्यात आले असल्याने कभी खुशी कही गम झाले असल्याने भावि उमेदवारांना आता नव्याने मतदारसंघ निवडावे लागणार आहे.नव्याने आरक्षण शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंचायत समिती बचत भवन मध्ये सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले यावेळी नव्याने आरक्षण पुढील प्रमाणे,प्रभाग क्र १ इतर मागासवर्गीय (ओ बी सी)महिला, प्रभाग क्र २ इतर मागासवर्गीय (ओ बी सी) पुरुष, प्रभाग क्र ३ एस सी पुरुष, प्रभाग क्र ४ सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्र ५ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र ६ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र ७ सर्वसाधारण महिला,प्रभागक्र ८ सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र ९ सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र १० सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र ११ एस टी पुरुष, प्रभाग क्र १२ सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र १३ एस टी महिला, प्रभाग क्र १४ इतर मागासवर्गीय (ओ बी सी) महिला,प्रभाग क्र १५ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र १६ इतर मागासवर्गीय (ओ बी सी ) पुरुष, प्रभाग क्र १७ एस टी महिला याप्रमाणे सोयगाव येथील बचत भवन मध्ये उपविभागीय अधिकारी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण कार्यक्रम झाला यावेळी तहसीलदार रमेश जशंवत, नगरपंचायत मुख्याधिकारी सुर्यवंशी, शिंदे,मोरे,विठ्ठल जाधव,राजेंद्र जंजाळ, राजेश मानकर, सारग बागले ,समाधान गायकवाड, गवळी,हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
नव्याने काय आरक्षण निघणार यासाठी सर्व पक्षाचे पद अधिकारी उपस्थित होते मात्र काही भावि उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बाधुन असल्याने मात्र आरक्षणाने भावि उमेदवारांना चकवा देत घेर निराशा झाली असल्याने दिवसभर याच विषयालाचा चर्चेचा उधाण आली होती.