ब्रेकिंग
दोन पिस्टलसह एक आरोपी ताब्यात ; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त
चोपडा (जि.जळगांव) : विश्वास वाडे , तालुका विशेष प्रतिनिधी
चोपडा : नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाच्या संयुक्त कारवाई आज दि. १२ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास. चोपडा तालुक्यातील सत्रासेन शिवारात उत्तमनगर जवळ जगपालसिंग अजबसिंग पवार (वय ४४)रा.हरिपूर तहसिल खेकडा जिल्हा भागपथ उत्तरप्रदेश याच्याकडून दोन पिस्टल,एक मॅगझीन सह एक रेनॉल्ट कंपनीची चारचाकी असे एकूण ४ लाख ६० हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केला.
जगपालसिंग अजबसिंग पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर या कारवाईत नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक पथकातील सहा फौजदार बशीर तडवी,पोहेकॉ रामचंद्र बोरसे,पो.ना. मनोज दुसाने तर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर,पोहेकॉ लक्ष्मण शिंगाने,पो.ना. रितेश चौधरी,राकेश पाटील हे सहभागी होते.