ब्रेकिंग
Trending

आज दुपारी 3 वाजता वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू

पंकज मालवीय

धारणी : आज दुपारी 3 वाजता वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सालई व खारी गावातनागरिकांन मध्ये घबराट पसरली आहे . मृतक व्यक्तीचे नाव देवराज धन्नालाल दर्शिंबे वय 38 रा . सालईचा गावाचा रहवासी आहे . या घटनेची माहिती परिसरातील आमदार राजकुमार पटेल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची व संबंधित मृतक व्यक्तीची माहिती घेतली . आज मेळघाटात काळे ढग आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका व जोरदार पावसाची नोंद झाली आहे . दुपारी आकाशात जोरदार विजांचा कडकडाट जाणवला खारी सालईच्या मध्यभागी देवराज धन्नालाल दर्शिबे हे शेतातून घराकडे परतत होते त्याच दरम्यान अचानक वीज पडून देवराज धन्नालाल दर्शिबे यांचा जागीच मृत्यू झाल्याची खबर मिळताच आमदार राजकुमार पटेल , संतोष बैस , विनोद वानखेडे आदींनी सलाई येथे पोहोचून घटनेची व मृत व्यक्तीची माहिती घेतली , या घटनेबाबत सलाई खारी गावात शोककळा पसरला आहे . वृत्त संकलित होईपर्यंत मुतकच्या मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया बाकी होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे