महाराष्ट्र
नांदगाव, चांडगाव ते जरुळ डांबरीकरणाचे निकृष्ट दर्जाचे कामाची मनोज मुळे यांनी केली पाहणी
वैजापूर (भिमसिंग कहाटे) वैजापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत Crf या शीर्षकामधून मंजूर झालेल्या तीन कोटी 47 लक्ष रुपये नांदगाव, चांडगाव ते जरुळ डांबरीकरणाचे निकृष्ट दर्जाचे कामाची ग्रामपंचायत सदस्य नारळा व तालुका उपाध्यक्ष भाजपा मनोज पाटील मुळे यांनी पाहणी केली. व आस्था संबंधित अभियंता व कॉलिटी डिपारमेंट यांना सविस्तर सदरील कामाबद्दल फोनद्वारे माहिती दिली. सदरील कामात निकृष्ट दर्जाचे होत आहे व साईड पंखामध्ये मुरूम ऐवजी काळी माती दाखवण्यात आली आहे. सदरील काम हे चांगल्या दर्जाचे न झाल्यास काम बंद करू असा इशारा संघर्ष नेते मनोज मुळे यांनी प्रशासनाला दिला आहे.




