धुळे व मालेगाव येथे मुस्लिम उंन्नती सेवा फाउंडेशनच्या वतीने नशा मुक्त शिबिराचे आयोजन
धुळे (प्रतिनिधी) धुळे व मालेगाव शहर हे पूर्णपणे नशा मुक्त झाले पाहिजे यासाठी मुस्लिम उंन्नती सेवा फाउंडेशन यांच्या वतीने धुळे लोकसभा मधील मालेगाव शहरातील रहेमताबाद 60 फुटी रोड येथे नशा मुक्त शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव शहराच्या पोलीस उपअधीक्षक लता दोंदे, दिया आय केअर हॉस्पिटल चे अभिजित पवार, डॉ शाह डॉ खुराणा तसेच या शिबरासाठी ज्यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले ते औरंगाबाद येथील नशा मुक्त चे एम डी डॉक्टर शेख फसीहुद्दीन व त्यांचे सहकारी आदींची सहकार्य लाभले व हे सर्व मान्यवर हे या कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच या शिबिरात धुळे व मालेगाव मधील मिळून 250 नशा करणाऱ्या रुग्णांची तपासणी करून प्रथमउपचार करण्यात येऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले की, नशा केल्याने कॅन्सर लिव्हर अश्या अनेक आजार होतात व यामुळे माणसाला आपले जीव गमवावे लागते तरी मालेगाव शहरात अनेक कार्यक्रम आज पर्यंत घेण्यात आले. परंतु नशा मुक्त शिबीर हे प्रथमच घेण्यात आले व हे काम नक्कीच अभिनंदनला पात्र आहे असे मत आपल्या मनोगत मध्ये मालेगाव शहरांच्या पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी केले. तरी मुस्लिम उंन्नती सेवा फाउंडेशन धुळे मालेगाव टीमच्या वतीने आयोजित हे नशा मुक्त शिबीराला यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष शेख अफरोज, उपाध्यक्ष खालिद एस के, सचिव अकबराच्या खानसह सचिव आरिफ खान, खजिनदार शेख सलीमसह खजिनदार अहेमद शेख, प्रसिद्धी प्रमुख राशीद शेख, वरिष्ठ सल्लागार शाबान तांबोळी आदींनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केले.