दोंडाईचा नगरपालीकेवर नुकतेच बसलेले प्रशासकीय अधिकारी तथा शिंदखेडा तहसीलदार यांची तडकाफडकी बदली
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथील दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेवर नुकताच २८ डिसेंबर रोजी सत्ताधारी गटाचा कार्यकाळ संपत असल्याने शासन निर्णय नुसार संबधित नगरपालीकेवर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यापैकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सरकारी आदेश सर्व जिल्हा स्तरावर देण्यात आले होते. त्यानुसार दिनांक २९ डिसेंबर रोजी शिंदखेडा येथील तहसीलदार सुनील सैदांणे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेचा पदभार स्विकारला. मात्र पदभार स्विकारायला एक दिवस होत नाही. म्हणजे फक्त एकवीस तासात गावातील काही राजकीय महारथींनी चक्रे फिरवत शिंदखेड्याचे तहसीलदार सुनील सैदांणे यांची नियुक्ती रद्द करत अप्पर तहसीलदार यांच्या नावाची शिफारस करत, पदभार स्विकारण्याचा कार्यक्रम नगरपालीकेत पार पाडण्यात आला आहे.

आज दुपारी १.००वाजता जशी ही प्रशासकीय अधिकारी अदलाबदलीची वार्ता गावात पसरली. तशी पाच वर्षापासुन सर्व करोडोंच्या विकास कामांचे ओझे सहन करत असलेल्या प्रामाणिक-जाणकार-सुज्ञ लोकांवर एकप्रकारे करोना आजार गेल्यानंतर जसा ओमीक्रोन आजार थैमान घालू पाहत आहे. तशीच परिस्थिती ह्या प्रामाणिक-जाणकार-सुज्ञ लोकांपुढे,आता करोडोंच्या विकास कामांची माहिती कशी मिळवता येईल का, पुन्हा प्रशासकीय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार यांच्या सेवानिवृत्तीची घरी थांबत वाट पहावी लागेल, अशी परिस्थिती उभी राहिली. समजा जर शासन आदेश शिंदखेड्याचे तहसीलदार सुनील सैदांणे यांच्या नावाने ऐकवेळा निघाला होता व ते दोंडाईचा नगरपालीकेवर प्रशासकीय अधिकारी म्हणून निवडणुक लागेपर्यंत राहिले असते तर काय फरक पडला असता. जर पालीकेत काही चुकीचे झाले नाही. फक्त न फक्त करोडोंचे विकास कामे झाले आहेत आणि ते ही फक्त गावाच्या विकासासाठी झाली आहेत. तर प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रामाणिक तहसीलदार सुनील सैंदाणे येवो का त्यांच्या जागी प्रामाणिक आयुक्त तुकाराम मुंडे येवो. गलत करा नही, तो डर किस बात का?. काय फरक पडला असता.उलट करोडोंच्या विकास कामांचे दुध का दुध व पाणी का पाणी होऊ द्यायला पाहिजे होते.
पण आता चोवीस तासातच कामाने कर्तव्यदक्ष-प्रामाणिक अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्याने, जनतेला माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून खंरच विविध विकास कामांची माहिती इंतभुत मिळेल का? यांची शाश्वती राहिली नाही. येणारा प्रशासकीय अधिकारी जर पुढाऱ्यांचे-लोकप्रतिनिधी लोकांचे कानात ऐकणारा असेल तर जनतेचे प्रश्न-समस्या-विकास जावो खडड्यात. लोकप्रतिनिधींवर गाव चालते ना,पहिले त्यांचेच ऐकावे लागेल, असेच त्यांचे वागणे राहिल. त्यानंतर सत्यवादी दुबेचा नंबर लावला जाईल.म्हणून विरोधक व जनता प्रामाणिक अधिकाऱ्याच्या बदली बाबत आवाज उठवतील का नेहमीप्रमाणे म्हणजे मागील पाच वर्षाप्रमाणे आणखी पुढे प्रशासकीय अधिकारी यांच्या सेवानिवृत्ती नंतर संधी मिळेल,असे म्हणून हा ही अन्याय सहन करतील.
आज ह्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या बदलीसाठी गावातील कोणकोणते महारथी गेले होते,हे जगजाहीर आहे. पण शासनाचा करोडोने विकास कामासांठी आलेल्या निधीचाही हिशोब सर्वसामान्य जनतेला कळण्यासाठी, अशा प्रामाणिक अधिकाऱ्याची गरज होती.तरच माहिती अधिकाऱ्याच्या अर्जाला महत्त्व राहिले असते.नाहीतर दिवसागणिक किती लोकांच्या तक्रारींना नगरपालीका केराची टोपली दाखवते, ह्याचा अनुभव प्रत्येकाला आहे. म्हणून विरोधकांनी व जाणकार-सुज्ञ जनतेने प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी म्हणून सैदांणे पाहिजे म्हणून गांधी मार्गाने आंदोलन छेडले पाहिजे, असा सुर सध्या प्रशासकीय अधिकारींच्या तडकाफडकी बदली परिस्थितीवर सर्वसामान्य जनतेतुन निघत आहे.



