महाराष्ट्र

अखेर लळींग किल्ला सौरदिव्याने उजळला दुर्गसेवक सुरेश सूर्यवंशी यांचे अनोखे अभिवादन

धुळे (करण ठाकरे) येथील लळींग किल्ल्यावर सौरदिवा बसविण्यात आला. शिवजयंतीचा मुहूर्त साधून दुर्गसेवक सुरेश सुर्यवंशी यांनी हा उपक्रम राबवून अनोखे अभिवादन केले.

पूर्वी ३५२ वर्षांपूर्वी गडाच्या माथ्यावर रात्रभर तेवत राहील अशी मशालांची व्यवस्था होती, असे जुने जाणकार सांगतात. पुढे अनेक स्थित्यंतरे झाली. देश स्वतंत्र झाला गडावरील अग्नीचा तो दिवा बंद झाला. ब्रिटिश काळात सुद्धा वर एक वॉच टॉवर कंदील असायचा. खान्देशाचे प्रवेशद्वार असलेला लळींग गड रात्रीही पंचक्रोशीतून दिसू शकेल, यासाठी २०१५ मध्ये लळींग किल्ल्यावर एक दिवा बसविण्याचा संकल्प सुर्यवंशी यांनी केला होता.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गडाच्या माथ्यावर दिवा बसविण्याची संकल्पना सर्वात अगोदर युवराज संभाजी महाराज, कोल्हापूर यांना सांगितली. त्यांनी उत्तम संकल्पना असल्याचे सांगून मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. योगेश ठाकरे व हेमंत सोळंखे यांना संकल्पना सांगितली. त्यांनी तत्काळ मदत दिली.त्यांचे सहकार्य मिळाल्यावर पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला. त्यांनीही सहकार्य दिले. मग दिवा घेण्यावर लक्ष केंद्रित केले.

मात्र, पुरातत्त्व विभागाकडून उत्तम कार्य सुरू असल्याने बेस मिळत नव्हता. त्यात कोरोनामुळे दोन वर्षे गेले. अखेर २०२२ च्या शिवजयंतीचे मुहूर्त साधून दुर्गसेवक सुरेश सूर्यवंशी व कुटुंबिय, मित्र मंडळी यांनी लळींग गडाच्या माथ्यावर सौर दिवा बसविला. यामुळे आता लळींग किल्ला रात्रीही लांबून दिसतो.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे