समग्र शिक्षाअंतर्गत शालेय गणवेश वाटप कार्यक्रम
म्हसदी प्र,नेर (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद शाळा आंबावाडीत येथे समग्र शिक्षाअंतर्गत शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पंडितराव देवरे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेची प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना म्हसदी प्र,नेर गटातील जिल्हा परिषद सदस्या इंदुबाई मल्हारी गायकवाड यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी ग्रा पं सदस्या ज्योती बाळू ठाकरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू उखा सोनवणे, सदस्य त्रिलोक रामदास सोनवणे, शालेय मदतनीस सुंदरबाई देवरे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते इयत्ता 3 रीच्या वर्गातील विद्यार्थी राहुल याने या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा आभार मानले.