“खान्देश युवक बिरादरी (धुळे) अंतर्गत विद्यार्थी बिरादरी आयोजित” निबंध स्पर्धा तसेच भित्तिचित्रे स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
धुळे जिल्हा विशेष प्रतीनिधी
धुळे :धुळे शहरात खान्देश युवक बिरादरी (धुळे) अंतर्गत विद्यार्थी बिरादरी तर्फे शहरात निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण तसेच भित्तिचित्रे स्पर्धा आयोजित करण्यात आली . युवक बिरादरी (भारत) चे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. अनिल सोनार (महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष) सर यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांना सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून ‘विद्यार्थी बिरादरी’ कार्यरत आहे. युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास वाढविण्यासाठी यावेळी देखील भारतीय समाजातील ज्वलंत प्रश्नांवर ‘निबंध स्पर्धा तसेच भित्तिचित्रे स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. ज्यात अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व यश संपादन केले.
प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अनिल सोनार यांनी उपस्थिती दर्शविली. प्रा. सोनार आपल्या मनोगतात म्हणतात की, “सच्चा कलाकार हा आपल्या अंतर्गाभ्यातून कलाकार असला पाहिजे. जे तो व्यक्त होतो, ते त्याने आत्मसात केले पाहिजे. कलाकाराचे मन स्पंज सारखे असले पाहिजे,जो पाण्यात टाकल्याबरोबर सर्व पाणी शोषून घेतो. तशीच कलाकाराने कला देखील मनाद्वारे शोषून घेतली पाहिजे.पक्षी जर कोणत्याही फांदी वर बसला आणि वारा जोरात वाहत असेल तरीही तो पक्षी उडून जात नाही, कारण त्याला आपल्या पंखांवर विश्वास असतो, तसेच एखाद्या कलाकाराला आपल्या कलेवर ही तेवढाच विश्वास असला पाहिजे, जेवढा त्या पक्ष्याला त्याच्या पंखांवर असतो. जोपर्यंत आपल्या व्यक्तिगत अनुभवाचे वैश्वीवकरण होत नाही, तोपर्यंत तुमच्या कलेला खऱ्या कलेचं रूप प्राप्त होत नाही.”, तसेच भित्तिचित्रे स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अनिता झेंडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. झेंडे मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजची ही युवा पिढी उद्या आपलं भविष्य ओळखण्यासाठी सक्षम असली पाहिजे, आपल्या निर्णयावर ठाम असली पाहिजे, तरचं भविष्य उज्ज्वल बनवता येईल”.खान्देश युवक बिरादरी( धुळे) अंतर्गत विद्यार्थी बिरादरी चे अध्यक्ष डॉ सुरेंद्र मोरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले “ तरुणांनी आजच्या युगात आपल्या लक्ष्य पासून न भरकटता सामाजिक बांधिलकीची एक साखळी निर्माण करण्याची गरज आहे, जेणेकरून एक तरूण अनेकांना प्रभावी बनवून भविष्याची खरी दिशा दाखवू शकेल”. तसेच यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभय शीनकर सर उपस्थित होते “आपल्या सारखा युवा वर्ग जर सचोटीने काम करत राहिल तर नक्कीच आपण आपल्या योजलेल्या उद्देशापर्यंत पोहोचू शकतात”.
अतिथी मनोगता नंतर लगेचच विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी ‘निबंध स्पर्धा व भित्तिचित्रे स्पर्धा’ दोन्ही स्पर्धेसाठी दोन गटांत बक्षिसे देण्यात आली होती. निबंध स्पर्धा लहान गटात (१४ ते १८ वय) प्रथम पारितोषिक सानिका देविदास पाटील, द्वितीय पारितोषिक सिद्धीका सुनील सोनवणे, तृतीय पारितोषिक सावली गजेंद्र चौधरी, प्रथम उत्तेजनार्थ वैष्णवी दिलीप पाचपुते, द्वितीय उत्तेजनार्थ रोशनी हिरालाल पाटील, मोठा गट (१९ ते २३) प्रथम पारितोषिक पूनम मधूकर पवार, द्वितीय पारितोषिक रेखा अशोक पाटील, तृतीय पारितोषिक पल्लवी संजय खैरनार, प्रथम उत्तेजनार्थ प्रशांत गुरूदास जाधव, द्वितीय उत्तेजनार्थ प्रथमेश प्रदीप बागड , तसेच भित्तिचित्रे स्पर्धा, लहान गटात (१४ ते १८) प्रथम पारितोषिक तृप्ती संजय माळी, द्वितीय पारितोषिक सैफ मोईन शेख, तृतीय पारितोषिक सागर रतीलाल बडगुजर, मोठा गट (१९ ते २३) प्रथम पारितोषिक अश्विनी भरत कासार, द्वितीय पारितोषिक पूनम मधूकर पवार, तृतीय पारितोषिक निर्मिती राजेश वैद्य या विद्यार्थ्यांना देण्यात आले.
निबंध स्पर्धेसाठी प्रा. मोरेश्वर नेरकर सर आणि प्रा. भाग्यश्री पाटील मॅडम, मच्छिंद्र निंबा पाटील (न्याहळोद), तसेच भित्तिचित्रे स्पर्धेसाठी प्रा.लोहालेकर सर आणि प्रा.पूर्णिमा वानखेडे यांनी परिक्षक म्हणून आपली उपस्थिती दर्शविली. एस.एस.वी.पी.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थान भूषविले होते.यावेळी कार्यक्रमात अतिथी म्हणून डॉ. अनिता झेंडे मॅडम, खान्देश युवक बिरादरी (धुळे) चे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र मोरे सर, मुख्य संयोजिका कु. प्रियंका विजय पवार, संयोजक व खजिनदार चि. लोकेश अनिल येशीराव, डॉ. संभाजी पाटील सर, डॉ. मोहन पावरा सर यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य संयोजिका कु. प्रियंका विजय पवार तसेच संयोजक लोकेश अनिल येशीराव यांनी सांभाळले होते. कार्यक्रमात बादेसबा जीलानी, अंकिता पवार, तेजस्विनी महाजन, गौतमी जगदेव, रोहित शिंदे, वैभव शिंदे,कविश्वर भदाने, प्रितेश पाटील, महेश भामरे, अभिजित घुगे, मनिष वाघ, आदेश सावंत, चेतन सुर्यवंशी, मयूर सोनवणे इ. सदस्य उपस्थित होते.