के.वाय.के.एम फाऊंडेशन तर्फे जादूचे प्रयोग सादरीकरण करून एस.टी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न
जादूगार चेतनकुमार यांच्याकडून जादूच्या माध्यमातून संपाला पाठिंबा
धुळे जिल्हा विशेष प्रतिनिधी
धुळे : सध्या महाराष्ट्रात एस.टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, या संपला अनेक माध्यमातून पाठिंबा मिळत आहे, त्यानुसार धुळे जिल्ह्यातील एस.टी डेपो येथे सुरू असलेल्या संपाला रोज सर्व कर्मचारी उपस्थित राहतात, त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि मनोबल वाढावे या उद्देशाने के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे तर्फे प्रकल्प “आनंद” अंतर्गत सुप्रसिद्ध युवा जादूगार चेतनकुमार यांचे अदभूत अविश्वसनीय जादूचे प्रयोग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमात के.वाय.के.एम फाऊंडेशनचे सचिव कल्पेश बोरसे यांनी सहानुभूती पूर्वक कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा विचार करून लवकरच संपावर तोडगा निघेल आणि पुन्हा लालपरी धावेल अशी अपेक्षा व्यक्त केली, तद्नंतर जादूगार चेतनकुमार यांनी जादूच्या माध्यमातून ३८ एस.टी. कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, आणि सर्वांचे मनोरंजन केले. कामगार संघटनेचे रुपेंद्र तायडे व इतर पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाद्वारे संपाला बळ मिळाले आणि मनोबल वाढले यासाठी आभार व्यक्त केले.
यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, स्वयंसेवक दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, प्रियंका विसपुते, स्नेहा बडगुजर, प्रियंका विसपुते, भाग्यश्री भावसार, कल्याणी मोरे आदी उपस्थित होते.