महाराष्ट्र
मोफत कोविड लसीकरण शिबिर, नागरिकांना मनसे कडून विनम्र आव्हान 💐

उद्या *मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१* रोजी माननीय आमदार राजू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनसेचे शहर संघटक श्री.योगेश रोहिदास पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० या वेळात *गणपती मंदिर घारिवली गाव* डोंबिवली पूर्व येथे एक दिवसीय मोफत मोबाईल लसीकरण शिबिराद्वारे कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
नागरिकांनी या मोबाईल लसीकरण शिबिराद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत लसीकरणाचा (पहिला आणि दुसऱ्या डोसचा) लाभ घ्यावा असे आवाहन मनसेचे शहर संघटक श्री योगेश रोहिदास पाटील यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी. ९८२०२७५१२७ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
ही नम्र विनंती.



