महाराष्ट्र

शिंदखेडा पीक संरक्षण सोसायटीत पोलीस उपअधीक्षक आत्माराम प्रधान यांचा गौरव

शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या कार्यालयात चेअरमन नाना चौधरी यांच्या संकल्पनेतुन शिंदखेडा येथे बराच काळ सेवा देणारे आत्माराम प्रधान यांची नंदुरबार जिल्ह्य़ात पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती झाल्याने सोसायटीचे सर्व पदाधिकारी व शहरातील विविध राजकीय सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी मोठय़ा उत्साहात सन्मान करण्यात आला.

सन्मानित आत्माराम प्रधान यांनी पीक संरक्षण सोसायटी व शहरातील पदाधिकारी यांनी माझ्या शिंदखेडा येथे मागील काळात चांगल्या सेवेची न विसरता आज माझ्या कार्याची दखल घेतली.व प्रेमापोटी मला मिळालेली नंदुरबार जिल्ह्य़ात आर्थिक शाखेच्या जिल्हा पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली म्हणून माझा आजचा गौरव कायमस्वरुपी आठवणीत राहील. हे माझ्या वर शिंदखेडा शहरवासियांचे ऋणानुबंध कधीच विसरणार नाही असे आभार मानत आपल्या मनोगतातून विचार प्रकट केले. सुत्रसंचलन व प्रास्तविक अभ्यासु तरुण नेतृत्व व नगरपंचायत चे स्विकृत नगरसेवक अरुण देसले यांनी शिंदखेडा येथे मागील काळात दिलेल्या प्रामाणिकतेतुन सेवा व आपसातील वादविवाद एकोप्याने मिटायला हवे अशी सोज्वळ भुमिका निभावली. असे आत्माराम प्रधान यांचा कार्याचा यथोचित सन्मान आहे असे विविध उदाहरणे दिली.

याप्रंसगी पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन विजय पोपट चौधरी उर्फ नाना चौधरी व व्हाय चेअरमन योजेश माधवराव देसले संचालक अरुण चैत्राम देसले , दिलीप आधार पाटील, बन्सीलाल पिंताबर बोरसे, कैलास निंबा पाटील, दत्तात्रय जगन्नाथ देसले, अशोक राजाराम परदेशी, गजानन विश्वास भामरे , यादव प्रेमराज मराठे, विलास अर्जुन मोरे, संचालिका मिनाबाई प्रकाश पाटील, इंदुबाई रमेश मराठे स्विकृत संचालक सुरेश बाबुलाल महाले , संजय गुलाबराव बडगुजर, सचिव मनोहर रामराव भामरे यांसह नगरपंचायत विरोधी पक्षनेते सुनील बाजीराव चौधरी, नगरसेवक प्रकाश नागो देसले, स्विकृत नगरसेवक अरुण भिकनराव देसले, अशोक पोपटराव बोरसे, माजी नगरसेवक सुभाष रावसाहेब देसले, गणेश मराठे, नाना मिस्तरी, निलेश परदेशी, पत्रकार अशोक गिरणार , यादवराव सावंत, योगेश चौधरी यांनी सत्कार केला तसेच शहरातील विविध पदाधिकारी व शेतकरी उपस्थित राहुन गौरव सोहळा संपन्न केला. आभार विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे