जळगाव जिल्हा
वावडद्यात विशाल देवकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण
राजेश वाडेकर यांच्या कडून वावडद्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण
पाचोरा (प्रतिनिधी) वावडदा येथील सरपंच राजेश वाडेकर यांनी स्वखर्चातून गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. या रुग्ण रुग्णवाहिकेचे लोकार्पण विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त वावडदा येथील सरपंच राजेश वाडेकर यांनी स्वखर्चातून गावासाठी रुग्णवाहिकेचा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी मजूर फेडरेशनचे चेअरमन लीलाधर तायडे, पुरुषोत्तम चौधरी, अजय सोनावणे, नीलेश पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, कानळदा येथील सरपंच पुंडलिक सपकाळे, भय्या चव्हाण, संभाजी पाटील, मधुकर पाटील, ईश्वर पाटील, समाधान निकुंभ, अरुण पवार, नितीन जैन, बाबू पिंजारी, समाधान सपकाळे आदी उपस्थित होते.