पुन्हा एकदा धुळे जिल्ह्यातील धाडरे गावाचे नाव सातासमुद्रापार.
धुळे जिल्हा प्रतिनिधी : करण ठाकरे
धुळे : नाशिकच्या आणखी दोन खेळाडू व धुळे जिल्ह्यातील धाडरे गावाचे सुपुञ छोरिया यांनी आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक व धुळे जिल्ह्यातील धाडरे गावाचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. या तीन विजेत्यांमध्ये भगर उद्योगक महेंद्र छोरिया, प्रशांत डबरी आणि डॉ. सुभाष पवार यांचे समावेश आहे. डॉ. पवार यांनी वयाच्या ६६व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा जिंकून नवा आदर्श निर्माण केला आहे.
छोरिया आणि डबरी यांनी दक्षिण अफ्रिकेतील अतिशय खडतर अशी आयर्नमॅन स्पर्धा विहीत वेळेच्या आधीच पूर्ण केली आहे. तर, डॉ. पवार यांनी मेक्सिकोत आयर्नमॅन होण्याचा मान पटकावला आहे. सायकलिंग, रनिंग आणि स्विमिंग अशा तीन टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होते. अतिशय खडतर आणि शारीरीक क्षमतेची कसोटी पाहणारी ही स्पर्धा असते. जगभरातून अनेक खेळाडू या स्पर्धेत येतात. त्यातील मोजक्या जणांनाच ती पटकावला आहे.आता एकाचवेळी ३ जण आयर्नमॅन झाले आहेत. छोरिया हे दुसऱ्यांना आयर्नमॅन बनले आहेत.