भाजपा तर्फे अमरावती, नांदेड व मालेगांव येथील हिंसक घटनांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन
धुळे : जिल्हा विशेष प्रतिनिधी
धुळे : भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीण जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अमरावती, नांदेड व मालेगांव येथील हिंसक घटनांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. दि. २२ नोव्हेंबर रोजी धुळे येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांचा नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसंगी धुळे जि. प. माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, कामराज निकम, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस डि. एस. गिरासे, जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, सरचिटणीस अरुण धोबी, कृषी सभापती संग्राम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद्र जाधव, धुळे माजी जि. प. सभापती बापु खलाणे, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, जि. प. सदस्य राम भदाणे, पंकज कदम, धुळे पं. स. सभापती प्रा. विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील, पिंपळनेर अध्यक्ष मोहन सुर्यवंशी, जिल्हा बॅन्क संचालक राजेंद्र देसले, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, विरेंद्र गिरासे, शाम बडगुजर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थित होते. नंतर शांतता आणि सुव्यवस्थेला धक्का लावणार्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी यासंदर्भात धुळे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले. जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, जिल्हा-तालुका प्रमुख पदाधिकारी प्रदेश, जिल्हा व तालुका पदाधिकारी, मोर्चा/ प्रकोष्ठ (आघाडी) पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.