मैंदाणे गणा तालुका साक्री अंतर्गत कोविड 19 प्रतिबंधक लसिकरण
धुळे : जिल्हा विशेष प्रतिनिधी
साक्री : 23 नोव्हेंबर 2021 रोजी मैंदाणे गणा तालुका साक्री अंतर्गत कोविड 19 प्रतिबंधक लसिकरण सत्र आयोजित करण्यात आले होते सदर लसिकरणात बोदगाव, चिंचपाडा,भाटजिरा, साबरसोंडा, पाचमौली,आमोडे,कालदर,ढोलीपाडा ,मैदाणे ,झंझाळे,धवळी विहिर , किरवाडे येथे लसिकरण करण्यात आले असुन यासाठी मैदाणे पं.स.गणाच्या सदस्य संगिताताई गणेश गावित , आदिवासी बचाव अभियानचे तालुका प्रमुख गणेश गावित , बोदगांव प्रशासक पी.एस.गवळी, ग्रामसेवक पंकज पगारे ,जे.डी.गवळी ANM, ए.एस.बहिरम ANM, कालदर सरपंच, युवराज चौरे, आमोडे सरपंच, पितांबर गवळी, ज्योतिराव बहिरम, रघुनाथ धनगर यांचे सहकार्य लाभले, या अभियानात प्रत्येक घरी जाऊन “हर घर दस्तक” लसिकरण सत्र राबविण्यात आले तसेच जे ग्रामस्थ लसिकरण करवून घेण्यास सहाय्य करणार नाहीत त्यांना कोणतेही शासकिय दाखले, उतारे मिळणार नाहीत तसेच सर्वच शासकीय आस्थापनांमध्ये प्रवेश बंदी असणार आहे तरी राहिलेल्या ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीं मार्फत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे . यासाठी श्री.जे.टि.सुर्यवंशी , गट विकास अधिकारी , पंचायत समिती , साक्री व श्री.एस.एस.भामरे विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.