भुसावळ येथील ऋषिकेश सुरेश नरहिरे यांने जिंकले राष्ट्रीय स्तरावरील बाॅक्सिंग स्पर्धेत ब्रांझ़ मैडल .
भुसावळ-अखिलेशकुमार धिमान
दिनांक: १०नोव्हेंबर २०२२
भुसावळ: एलपीयु युनिवर्सिटी पंजाब येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील बाॅक्सिंग स्पर्धेत भुसावळ चा ऋषिकेश सुरेश नरहिरे यांनी ब्रांझ़ मैडल मिळविला आहे.
सविस्तर वृत्त असे कि,मागील हप्त्यात राष्ट्रीय स्तरावर आयोजित वेगवेगळ्या स्पर्धेत केन्द्रीय विद्यालय भुुुसावळ येथील आठ विद्यार्थ्यांनी भाग घेतले होते. सदर स्पर्धा पंजाब येथील एलपीयु युनिवर्सिटी येथे आयोजित करण्यात आली होती.
तेथे आयोजित मुष्ठीयुद्ध (बाॅक्सिंग) स्पर्धेत १४ वर्षीयगटातील ४४ ते ४६ या वजनाच्या अंतर्गत झालेली स्पर्धेत भुसावळ केंद्रीय विद्यालय येथील ऋषिकेश सुरेश नरहिरे यांने तिसरा क्रमांक पटकवून ब्रांझ़ मैडल मिळविला आहे. संपूर्ण शाळेत विद्यालय संघटन तर्फे शाळेतील प्राचार्यसह शिक्षकांनी त्याचे कौतुक केले.
आपल्या परिसरातील घडामोडी बघायला आजच़ सब्सक्राइब करा स्पीडन्यूज महाराष्ट्र👇 दिलेल्या लिंक वर क्लिक करायला विसरु नका
ht tps://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg