शहरातील निकुंज अपार्टमेंटमधील घर अचानक जळुन खाक ; एक मयत!
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेज जवळील सोना एजन्सी,महेश नगर मधील अपार्टमेंट मधील घराला पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एक मयत तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की,नाहाटा कॉलेज जवळील सोना एजन्सी,महेश नगर मधील निकुंज अपार्टमेंट मध्ये चार जणांचा परिवार राहत असून दि. २६ मार्च २०२२ रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याने घरातील ५५ वयाचे व्यक्ती जळून मयत झाले आहे. तर ३२वर्षीय तरुण जखमी झाला असून डॉ उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय येथे पुढील उपचार घेत आहे. घटनास्थळी परिसरातील नागरीक व नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर व कार्यकऱ्यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच परिवारातील सदस्यांना बाहेर काढून त्यांचा प्राण वाचविला.तसेच रुग्णवाहिका बोलावून जखमीस पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे.नेमके आग लागल्याचे कारण समजू शकले नसून घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहचले पुढील तपास करीत आहे.