महाराष्ट्र
शिंदखेडा शहरातील SBI येथे फिल्ड ऑफिसर नियुक्तीसाठी शहर राष्ट्रवादीचे निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कृषी कर्ज व ठिबक सिंचन कर्जाच्या साठी आवश्यक असलेल्या फिल्ड ऑफिसर ची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. सदरचे फील्ड ऑफिसर हे पद रिक्त असून ते तात्काळ भरण्यात येऊन फिल्ड ऑफिसर यांना रुजू करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना प्रवीण पाटील शहराध्यक्ष, मिलिंद देसले उपशहर अध्यक्ष, इरफान शेख अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष, गोलू बाबा देसले युवक शहर अध्यक्ष, चेतन देसले युवक शहर उपाध्यक्ष, बाळा मराठे, चेतन बडगुजर, देविदास बागुल, कमलेश देसले व तालुक्यातील विविध शेतकरी उपस्थित होते.