मुक्ताईनगर शहरातील सिड फार्म भागात घरातून मोबाइलसह दागिने लंपास ; चोरट्या सिसिटीव्हीत कैद
मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर शहरातील सिड फार्म मधील रहिवासी शेख हकिम शेख रशीद चौधरी याचे घरामधील अज्ञात चोरट्यांनी घरात चार्जिंगला लावलेले दोन संमसग कंपनी चे मोबाईल व टेबलावर ठेवलेली 30ग्राम सोन्याची पोत सह असा एकूण 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी गुरुवार 17 मार्च रोजी सकाळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि 17 मार्च रोजी सकाळी 06:45 वा चे सुमारस शेख हकिम शेख रशीद हे नगरपंचायत ची कचरा गाडी मध्ये कचरा टाकण्याकरता उठले व त्यावेळेस मोबाईल चार्जिंग ला लावलेला होता.कचरा टाकल्यानंतर घरासमोरील रोपांना पाणी टाकल्यानंतर ते घरामागील रोपांना पाणी टाकण्यासाठी मागे गेले होते. रोपांना पाणी टाकुन ते ठिक 7 वाजुन 10 मिनिटांनी घरात गेले त्यावेळी त्यांनी पत्नी नाजेमाबी हिला विचारला की माझा मोबाईल चार्जिंग लावलेला होता ते दिसत नाही व त्यांनी पत्नी कडे तिचा मोबाईल मागितला. त्यावेळी पत्नीने सागितले की माझा मोबाईल पण सापडत नाही व त्यांच्या लक्षात आला की टेबलावर ठेवलेली 30 ग्रॅम वजनाची पोत सुध्दा घरात दिसत नसल्याने आमची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करुन मोबाईल व सोन्याची पोत चोरुन घेऊन गेला त्यात घराबाहेर लावलेले सिसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्या एकअज्ञात व्यक्ती पांढरा रंगाचा शर्ट व काळे रंगाची पॅन्ट घातलेला व्यक्ती घरात आला. चोरुन नेल्याचे समोर आले. याबाबत शेख हकिम शेख रशीद चौधरी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरटय़ांविरुधात तक्रार दिली. त्याचा तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास पोहेकाॅ आसीम तडवी करीत आहे.