महाराष्ट्र

सेना भवन येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.28, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्याहस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, कृउबा बाजार समितीचे संचालक दामूअणा गव्हाणे, सतीश ताठे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक शकुंतलाबाई बन्सोड, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, सिल्लोड सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड, संजय मुटकुटे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती वराडे, संजय काळात्रे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नारायण फाळके, प्रवीण मिरकर आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे