महाराष्ट्र
सिल्लोड येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
सिल्लोड ( प्रतिनिधी ) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौकातील नामफलकास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे यांच्यासह नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, सिल्लोड शेतकरी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बनसोड, आरेफ पठाण, गणेश भोसले, फहिम पठाण, स़तोष धाडगे, संजय मुरकूटे, देवराव भाग्यवंत ,मंजितराव भाग्यवंत , ज्ञानेश्वर कुदळ , सुभान खान शेख हबिब, योगेश कूदळ आदींची उपस्थिती होती.



