महाराष्ट्र

चोपडा महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.एस.ए.वाघ व डॉ.एल.बी.पटले आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथपाल डॉ.व्ही.आर.कांबळे यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या व त्यांच्या साहित्याच्या आधारे स्त्रीशिक्षण, सामाजिक सुधारणा व शेती सुधारणा संदर्भातील त्यांचे विचार उपस्थितांना सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री.डी.डी.कर्दपवार यांनी केले. तर आभार श्री.बी.एच.देवरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे