महाराष्ट्र

भाजपाच्या लोकप्रतिनिधींचे वागणे उचलली जीभ लावली टाळ्याला, राष्ट्रवादी महिला काँग्रेसची प्रतिक्रिया

धुळे : गेल्या २९ नोव्हेंबर २०२१ रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा संजय राऊत* यांच्या कन्येचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला. लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत संध्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खा सुप्रियाताई सुळे यांचा संजय राऊतां सोबतचा डान्स (नाच) करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर लागलीच भाजपचे लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे म्हणाले राज्यात शेतकरी आत्महत्या करत असतांना राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते नाचता आहेत. विखे साहेबांचे वागणे म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला आहे अशी प्रतिक्रिया *राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्ष अनिता भामरे* यांनी केली आहे.
खा संजय राऊत यांनी कन्येचा विवाहाला अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांना आमंञित केले. राजकारण आणि लग्न यात राजकीय मंडळी भेदभाव करीत नाही हे आपण नासिक मधील भाजप आमदार कन्येच्या विवाहसोहळ्यात अनुभवले आहेच. एकमेकांना पाण्यात पाहणारे राजकीय लोकप्रतिनिधी लग्नात असे वागत होते कि राजकीय कार्यकर्त्यांना देखील आपण झोपेत तर स्वप्न पाहत नाही ना अशी शंका मनात यावी असो….
लग्न म्हटले की आनंदी आनंद. त्यात राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी ही शेवटी माणसेच असतात. कोणी आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर नाच केला तर वावगे काय? इतरांच्या पोटात का दुखावे? याउलट करायचे असेल तर ताईंच्या कामाचे कौतुक करा. *आपल्या मतदार संघाचे प्रश्न सोडवतांना उगाचच लोकसभेत सतत संसद रत्न पुरस्कार नाही मिळत.* त्यासाठी अहोरात्र काम करण्याची जिद्द असावी लागते. मंत्रालय, राष्ट्रवादी भवन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे अनेक जण आपले विविध प्रश्न घेऊन ताईंकडे येतात. आलेल्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवितात. म्हणूनच ताईंचा आम्हाला सदैव अभिमान आहे. शक्य झाल्यास विरोधी असाल तरी ताईंच्या कामाचे कौतुक करा नाहीतर उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला असे तरी वागू नका.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे