कष्टकरी शेतकऱ्याने घेतला अखेरचा श्वास
जळगाव (प्रदीप दीक्षित) स्व अभिमान नथु पवार उर्फ नानासाहेब आज आपल्यातून निघून गेले आयुष्यभर कष्ट करत जीवन यशस्वी करणारे नाना आज अकस्मात जाणे यावर विश्वास बसत नाही हे मात्र नमूद करावेसे वाटते. नानांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो ही प्रार्थना नानांना सदगती मिळो ही दीक्षित परिवारातर्फे प्रार्थना
नाना शेती व्यवसाय करून आपल्या संसाराचा गाडा आपल्या पत्नी व तीन मुलं एक मुलगी यांच्यासह चालवत असे मुलांनी शिक्षण घेऊन पुढे जावं ही त्यांची इच्छा चिरंजीव विनायक आज शिंदखेडा येथेच इसेवेच्या माध्यमातून जनसेवेत दाखल शिवसेनेतून समाजसेवा घडावी, असा संकल्प करून सर्वत्र परिचित नाना ई-सेवा केंद्रावर बसून मुलाला म्हणजे विनायकला मदत करत असे
पवार (मराठे) परिवारातील दुसरा मुलगा देशसेवेत दाखल आहे तो म्हणजे भूषण उर्फ फौजी तोही देशसेवेसह वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून परिचित तिसरा मुलगा व्यवसायात अग्रेसर आहे. मुलीलाही शिक्षण देऊन विवाहित केले सर्व परिवार आज प्रतिष्ठित करण्यात नानांनी आपल्या जीवनात कष्ट उपसले आहे. हे मात्र निश्चित नानांच्या मागे पत्नी तीन मुलं एक मुलगी सुना नातवंड मुलगी जावई असा परिवार आहे असे म्हणावेसे वाटते “चंदनापरी देह झिजविला
कष्ट करीत यशस्वी जीवनाचा दिवस पाहिला “पवार परिवार जो दुःखाचा आघात कोसळला ते सहन करण्याची शक्ती इशवर त्यांना देवो ही पुनश्च प्रार्थना आम्हा सर्व पत्रकार मित्रांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली