संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमाची सुरुवात
सोयगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहित तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात सुरू करण्यात आला. या उपक्रमाचे संस्थेचे सचिव प्रकाश काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश आग्निहोत्री, उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
करिअर कट्टा अंतर्गत आयएएस आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला हा ऑनलाईन उपक्रम राबवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व उद्योजकता याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार, प्रा. प्रदीप गोल्हारे, प्रा. श्रीकृष्ण परिहार यांच्याशी संपर्क साधावा.
करिअर कट्टा उद्घाटन कार्यक्रमासाठी डॉ. पंकज शिंदे, डॉ. विनोद बारोटे, डॉ. भास्कर टेकाळे, डॉ. सैराज तडवी, डॉ. रामेश्वर मगर, डॉ. सुनील चौधरे, प्रा. संतोष पडघन, डॉ. शंतनु चव्हाण, प्रा. निलेश गावडे, डॉ. भाऊसाहेब ठाले, प्रा. गौतम निकम, प्रा. गायकवाड, प्रा. बोदडे, डॉ. गोविंद वाघमारे, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.